सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२




|| आरोग्यम धनसंपदाय ||
कावीळ - ब 
१) हेपेटाईटीस बी हा जगातील गंभीर एडस पेक्षा १०० पट अधिक संसर्ग जन्य रोग आहे.
२) जगातील आरोग्य संघटना ( व. ह. ओ.) च्या अहवाला नुसार हेपेटाईटीस बी मुळे दरवर्षी २० लाखाहून अधिक जन मृत्युमुखी पडतात.
३) जैविक स्त्राव, लाळ व इतर द्रवपदार्थ हे प्रसाराचे मुख्य स्त्रोत आहेत.
४) हेपेटाईटीस बी च्या संसर्गाने यकृत खराब होणे ( सी हॉसीस ऑफ लीव्हर ) यकृत कर्करोग होऊन शेवटी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
५) हेपेटाईटीस बी लसीचा समावेश सर्व देशांमधील युनिव्हर्सल इमुनायझेशन प्रोग्राममध्ये केला जावा आशी शिफारस जागतीक आरोग्य संघटना आणि इंडियन आसोसिएशन ऑफ मिडिया ट्रीक्सनी केली आहे. 
६) हेपेटाईटीस बी निश्चित उपचार नाही. फक्त लस हाच एकमेव उपचार आहे. 
७) लस घेतल्यावर एखाद्याला औषध / लसीची एलर्जि असेल तर अंगावर पुरळ येणे, अंग खाजणे, डोके दुखणे, मळमळणे इ. लक्षणे आढळून आल्यास घाबरून जाऊ नये. डॉक्टर्सच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.
८) आजारपणात, ताप असल्यास लस घेऊ नये.
रुबेला 
१) रुबेला च्या संसर्गामुळे गरोदर स्त्रीच्या गरोदरपणात गर्भपात होऊ शकतो किंबहुना जन्मास येणाऱ्या नवजात शिशुला शारीरिक व्यंग उदभवतात.
२) रुबेला प्रतीबंधक्लस प्रत्येक मुलीने आपल्या वयाच्या ९ वर्षानंतर केव्हाही टोचून घेणे आवश्यक.
टायफॉईड 
1) टायफॉईड हा विषाणू ग्रस्त अन्न, पाणी व माशांद्वारे फैलावणारा आजार आहे. 
२) टायफॉईड जंतू संसर्ग मेंदूपर्यंत गेल्यावर मेंदूज्वर होऊन रुग्णाला झटके येतात व रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. म्हणुन टायफॉईड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.
लस का घ्यावी ?
मानवाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत. आता या मध्ये बदल होऊन अन्न, वस्त्र, आरोग्य आणि निवारा अशी काळाची गरज बनलेल्या आहेत. त्याच प्रमाणे विविध असाध्य आजारांवर उपचार नाहीत. उदा. एड्स, स्वाइन फ्ल्यु, चिकनगुण्या,हेपेटाईटीस-बी, रुबेला व टायफाईड म्हणुन यावर आजार होण्या आगोदर सावध राहून लस घेणे गरजेचे झाले आहे.
लसिचे नियम पाळा व रोगराईला घाला आळा | लस पांढऱ्या काविळीची कवचकुंडले त्या व्यक्तीची ||
लस पांढऱ्या काविळीची कवचकुंडले त्या व्यक्तीची | सुखी कुटुंबाची चार कोन, आरोग्य पैसा मुळे दोन ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा