सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२


तंबाखूला नाही म्हणा

तंबाखू खाणे आरोग्‍याला किती धोक्याचे आहे हे माहित असूनसुध्‍दा अनेक लोकांना तंबाखूचे व्यसन सोडवत नाही. तंबाखू कंपन्‍या ग्राहकांना आकर्षक पॅकिंग आणि जाहिरातीच्‍या इतर साधनांचा वापर करून मोहात पाडतात आणि आरोग्‍याला तंबाखू घातक आहे ह्याकडे दुर्लक्ष करण्‍यास भाग पाडतात. पॅकिंगवर दिलेला सावधगिरीचा इशारा तंबाखूबाबत सत्‍य प्रकट करण्‍यासाठी सर्वांत सोपा उपाय आहे. सावधगिरीचे असे संकेत ज्‍यांमध्‍ये चित्रांच्‍या सहाय्याने तंबाखूच्‍या दुष्‍परिणाम दर्शविण्‍यात आले आहेत आणि ज्‍यायोगे लोकांना तंबाखू सोडण्‍यास किंवा कमी करण्‍यासाठी प्रेरित करता येते असे संकेत/ इशारे जास्त प्रभावी असतात.
चित्रित संदेश, अगदी अशिक्षित व्‍यक्‍तीलासुध्‍दा तात्‍काळ आणि स्‍पष्‍ट संकेत देतात. मात्र ह्यामुळे तंबाखूच्‍या पॅकिंगची संपूर्ण शोभाच कमी होते – एका अशा उत्‍पा्दनासाठी महत्‍वाचे ते असते कारण त्‍याचे नवीन उपयोगकर्ते विशेषत: तरूण आणि इमेज व ब्रॅन्‍डच्‍या बाबतीत जागरूक आहेत. ह्या धमकीची प्रतिक्रिया म्‍हणून आणि सर्व देशांमधून कृतीची मागणी आल्‍यामुळे, वर्ल्‍ड नो टोबॅको डे 2009 मोहीम खालील मुख्‍य संदेशावर केंद्रित आहे: तंबाखूच्‍या पाकिटांवरील लिहिलेली आणि चित्रित असलेली हेल्‍थ वॉर्निंग तंबाखूच्‍या वापराने आरोग्‍याला असलेल्‍या गंभीर धोक्‍याबाबत लोकांमध्‍ये तंबाखूचे सेवन कमी करण्‍यासाठी जागरूकता आणण्‍यासाठी सर्वांत कमी खर्चिक ठरली आहे.
धूम्रपानाचे दुष्‍परिणाम
  • तंबाखू हे मृत्यूचे एक मुख्‍य कारण आहे. दर वर्षी 50 लाखांपेक्षा जास्त लोक तंबाखूच्‍या दुष्परिणामांमुळे मरतात – एचआईव्ही/एड्स, मलेरिया आणि क्षयरोग आदी कारणांनी मृत पावणा-या लोकांच्या एकत्रित संख्येपेक्षाही ही संख्या खुप जास्त आहे.
  • उत्‍पादकाच्‍या मनाप्रमाणे वापर केल्‍यास मरण देणारे हे एकच उत्‍पादन आहे. धूम्रपान करणार्‍या लोकांपैकी अर्धे तंबाखू-जन्‍य रोगानेच मरतात. तसेच ह्यामुळे निघणारा धूरही सर्वांसाठी घातक आहे.
  • तंबाखू कंपन्‍या दर वर्षी नवीन लोकांना ही सवय लावण्‍यासाठी आणि जुन्‍या लोकांना ही सवय सोडण्‍यापासून परावृत्त करण्‍यासाठी कोट्यावधि डॉलर खर्च करतात.
  • पॅकेज डिझाइनच्‍या उपयोगासह जाहिराती आणि प्रचार मोहिमा, ह्या सर्वांचा आकर्षक उपयोग करून तंबाखू उद्योग त्‍याच्‍या उत्पादांच्‍या घातक प्रभावांकडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात.
  •  बहुतेक देश WHO फ्रेमवर्क कन्‍व्‍हेंशन ऑन टोबॅको कंट्रोलमध्‍ये सांगितल्याप्रमाणे, तंबाखूच्‍या पाकिटांवर ग्राफिक्‍सच्‍या मदतीने तंबाखूचे धोके दाखविण्‍याची गरज असल्‍याची मागणी करीत लढा देत आहेत. ते ह्या आंतरराष्‍ट्रीय कराराच्‍या अंतर्गत त्‍यांच्‍या वचनबध्‍दता पूर्ण करण्‍यासाठी WHO द्वारे विकसित करण्‍यात आलेल्‍या MPOWER टेक्निकल असिस्‍टन्‍स पॅकेजचा उपयोग करतात.
  • प्रभावी आरोग्‍य संकेत, विशेषत: ज्‍यामध्‍ये चित्रांचा समावेश आहे, उपयोगकर्त्‍यांना धूम्रपान सोडण्‍याची सोडण्‍याची किंवा व नवीन उपयोगकर्त्‍यांना त्‍यापासून कमी करण्‍याची प्रेरणा देतात. ही वास्‍तविकता असून देखील, 10 मधील 9 लोक अशा देशांत राहतात जेथे तंबाखूच्‍या पाकिटांवर चित्रसंदेशाची गरज भासत नाही.
  • निकोटीन एक अत्‍यंत लवकर चटक लावणारा पदार्थ आहे. लोकांना ह्याच्‍या वास्‍तविक धोक्‍यांच्‍या बाबतीत जागरूक करून तंबाखूचा वापर कमी करण्‍याची प्रेरणा देण्‍यासाठी फार मोठी वाटचाल करावी लागेल. तंबाखूच्‍या पाकिटांवर धोक्‍याचे संदेश देणे हे तंबाखू सोडविण्‍यासाठी अत्‍यंत सोपे, कमी खर्चाचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा