गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया

               भय्या दुधात पाणी मिसळून दूध वाढवतो असा संशय आहे का, रोज एक तरी डेड कॉल येतो का, वाण्याकडील वजन काटा चुकीचा वाटतो का...असा कोणताही प्रश्न मनात घिरट्या घालत असेल तर आता त्यांचा छडा लावण्याची संधी चालून आली आहे. केवळ एका फोनद्वारे ग्राहकांना आपली तक्रार नोंदवता येणार असून त्यांची सत्यता पडताळून पाहता येणार आहे. 

कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या ग्राहक क्षेत्रातील अशासकीय संस्थेने दुधाच्या दर्जाची तपासणी, फोन कॉल्सचे सवेर्क्षण आणि वजनकाट्यातील खरेपणा तपासण्याचा उपक्रम आखला असून ग्राहकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोसायटीने हा उपक्रम हाती घेतला असून सोसायटीच्या १८००२२२२६२ या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर सोसायटीच्या स्वयंसेवकांमार्फत पुढील प्रक्रिया सुरू होईल. 

दुधाची चाचपणी करायची असेल तर ग्राहकाने दुधाचे सॅम्पल चाचणीसाठी सोसायटीच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करायचे असून त्यानंतर आठवडाभरात ग्राहकांना त्याचा रिपोर्ट घरपोच पाठवण्याची व्यवस्था होईल. सेल्फ टेस्ट किट खरेदी करून ग्राहक घरीच दुधाची तपासणी करू शकतात. 

ट्राय'कडे धाडणार तक्रारी 

बरेचदा फोन घेतल्यानंतर किंवा केल्यानंतर पलीकडून काहीच आवाज ऐकू येत नाही. मात्र बॅलन्समधून पैसे वजा होतात. अशा प्रकारच्या डेड कॉल्सचीही तक्रार सोसायटीकडे वरील टोल फ्री नंबरवरून किंवा ८०८२८०८०८० या क्रमांकावर एसएमएसद्वारे नोंदवता येईल. या तक्रारी सोसायटीमार्फत 'ट्राय'कडे पाठविण्यात येणार असून त्यामागची कारणे शोधली जाणार आहेत. 

इलेक्ट्रॉनिक काट्यांतही फेरफार 

वजनकाट्याच्या बाबतीतही ग्राहकांना अनेक शंका असतात. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यातही दुकानदार फेरफार करीत असल्याच्या अनेक तक्रारी सोसायटीकडे आल्या. अनेक ठिकाणी फसवे वजनकाटे असल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांना शंका आल्यास वरील टोल फ्री क्रमांकावर त्यांना तक्रार नोंदवता येईल. तक्रार नोंदवल्यास ग्राहकांना ज्या वजन काट्याविषयी शंका वाटत असेल त्याची चाचणी स्वत: ग्राहकांना करता येईल अशी 'सेल्फ टेस्टिंग किट'ची व्यवस्था करण्यात आली आहे. 

वाईट सेवा, सदोष वस्तू पुरस्कार 

कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियातफेर् दरवषीर् वाईट सेवा देणाऱ्या कंपनीला 'वाईट सेवा पुरस्कार' आणि अनेक तक्रारींनी युक्त असलेल्या सदोष वस्तूला 'सदोष प्रॉडक्ट पुरस्कार' दिले जातात. या पुरस्कारांसाठी तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ग्राहकांनी १८०० २२२२ ६२ या क्रमांकावर किंवा सीजीएसआयइंडिया डॉट ओआरजी या वेबसाइटवर कंपनीविषयी किंवा प्रॉडक्टविषयी असलेल्या तक्रारी १५ जानेवारीपर्यंत नोंदवायच्या आहेत. त्यानंतर २० जानेवारीला सोसायटीतफेर् ही नावे घोषित करण्यात येईल. 

बुधवार, ४ जानेवारी, २०१२


हो हो हो…… ही आमची मुस्कटदाबीच आहे… सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरूणाईचा श्वास… फेसबुक म्हणजे लाखो दिलो की धडकन. कारण की, त्यांना मिळालेलं ते हक्कांच व्यासपीठ आहे… फेसबुक आणि गुगल यासारख्या माध्यमातून असंख्य घटनांना क्षणार्धात एक प्रकारचा न्याय मिळतो आहे. त्यामुळे आजच्या तरूणाईचा श्वास बनलेल्या या गोष्टीवर जर का सरकार बंदीची भाषा करत असेल तर हा अभिव्यकती स्वातंत्र्यावर घालाच घातला जातो आहे. त्यामुळे या सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे.

कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार फेसबुक आणि गुगल यांच्यावरील आक्षेपार्ह मजकूरावर या साईटने बंदी घालावी, नाहीतर या साईटसना त्यासाठी जबाबदार धरण्यात येईल, आता सिब्बल यांनी हे देखील स्पष्ट करावं की नक्की कोणत्या प्रकारचा आक्षेपार्ह मजकूरांना या सीईटनी मान्यता देऊ नये. काँग्रेस विरूद्ध वक्तव्य म्हणजे का आक्षेपार्ह मजकूर…  त्यासांठीच बहुधा ही बंधनं ह्या साईटसवर घालण्याचा मानस  या सिब्बल सरकारनी आपल्या मनी बाळगला असावा.

अण्णांनी भष्ट्राचाराविरोध मोहिम उघडली आणि त्यांना अभूतपूर्व असा पाठिंबा संपूर्ण भारतातून मिळू लागला. त्यानंतर मात्र सरकारचे धाबे चांगलेच दणाणले. त्याला या सोशल मीडियामुळे खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरलं. त्यामुळे सरकारविरोधी वाढता उद्रेक आणि भविष्यात त्यांचे भोगावे लागणारे परिणाम याच्या काळजीने सरकारमधील काही मान्यवर अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र यांना लक्षात ठेवावं सोशल मीडियावर कोणीच बंधनं आणू शकत नाही. कारण की आज प्रत्येकाला आपलं मत मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाल्याने प्रत्येकाला हा मीडिया आपलासा वाटू लागला आहे. आणि याची ताकद देखील फार मोठी आहे. त्यामुळे यापुढे सरकारने याची जाणीव ठेऊन वागल्यास याचा त्यांना फायदा होऊ शकतो.