शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

18 वर्षांखालची शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होईल, अशी कामं करणारी मुलं म्हणजेच बालमजूर होय. बाल कामगार कायदा 1986 नुसार 14 वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणार्‍या व्यक्तीवर कारवाई होते. बाल न्याय अधिनियमनानुसार 18 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणं हा गुन्हा आहे, 
भारत सरकारने मुलांना 54 प्रकारचे अधिकार दिले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारत सरकारने तसं मान्य केले आहेत.या अधिकारांत मुलांना जगण्याचा अधिकार, सहभागतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षतेचा अधिकार म्हणजेच सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्तता या अधिकारांचा समावेश केला आहे. बालमजुरीला आळा घालणं ही फक्त भारत सरकारची जबाबदारी नसून आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, असंही संतोष शिंदे यांनी सांगितलं. बाल मजूर आढळल्यास स्वयंसेवी संस्था, पोलीस, जिल्हा अधिकारी, कामगार विभाग यांना माहिती द्या,  




सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२




|| आरोग्यम धनसंपदाय ||
कावीळ - ब 
१) हेपेटाईटीस बी हा जगातील गंभीर एडस पेक्षा १०० पट अधिक संसर्ग जन्य रोग आहे.
२) जगातील आरोग्य संघटना ( व. ह. ओ.) च्या अहवाला नुसार हेपेटाईटीस बी मुळे दरवर्षी २० लाखाहून अधिक जन मृत्युमुखी पडतात.
३) जैविक स्त्राव, लाळ व इतर द्रवपदार्थ हे प्रसाराचे मुख्य स्त्रोत आहेत.
४) हेपेटाईटीस बी च्या संसर्गाने यकृत खराब होणे ( सी हॉसीस ऑफ लीव्हर ) यकृत कर्करोग होऊन शेवटी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
५) हेपेटाईटीस बी लसीचा समावेश सर्व देशांमधील युनिव्हर्सल इमुनायझेशन प्रोग्राममध्ये केला जावा आशी शिफारस जागतीक आरोग्य संघटना आणि इंडियन आसोसिएशन ऑफ मिडिया ट्रीक्सनी केली आहे. 
६) हेपेटाईटीस बी निश्चित उपचार नाही. फक्त लस हाच एकमेव उपचार आहे. 
७) लस घेतल्यावर एखाद्याला औषध / लसीची एलर्जि असेल तर अंगावर पुरळ येणे, अंग खाजणे, डोके दुखणे, मळमळणे इ. लक्षणे आढळून आल्यास घाबरून जाऊ नये. डॉक्टर्सच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.
८) आजारपणात, ताप असल्यास लस घेऊ नये.
रुबेला 
१) रुबेला च्या संसर्गामुळे गरोदर स्त्रीच्या गरोदरपणात गर्भपात होऊ शकतो किंबहुना जन्मास येणाऱ्या नवजात शिशुला शारीरिक व्यंग उदभवतात.
२) रुबेला प्रतीबंधक्लस प्रत्येक मुलीने आपल्या वयाच्या ९ वर्षानंतर केव्हाही टोचून घेणे आवश्यक.
टायफॉईड 
1) टायफॉईड हा विषाणू ग्रस्त अन्न, पाणी व माशांद्वारे फैलावणारा आजार आहे. 
२) टायफॉईड जंतू संसर्ग मेंदूपर्यंत गेल्यावर मेंदूज्वर होऊन रुग्णाला झटके येतात व रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. म्हणुन टायफॉईड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.
लस का घ्यावी ?
मानवाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत. आता या मध्ये बदल होऊन अन्न, वस्त्र, आरोग्य आणि निवारा अशी काळाची गरज बनलेल्या आहेत. त्याच प्रमाणे विविध असाध्य आजारांवर उपचार नाहीत. उदा. एड्स, स्वाइन फ्ल्यु, चिकनगुण्या,हेपेटाईटीस-बी, रुबेला व टायफाईड म्हणुन यावर आजार होण्या आगोदर सावध राहून लस घेणे गरजेचे झाले आहे.
लसिचे नियम पाळा व रोगराईला घाला आळा | लस पांढऱ्या काविळीची कवचकुंडले त्या व्यक्तीची ||
लस पांढऱ्या काविळीची कवचकुंडले त्या व्यक्तीची | सुखी कुटुंबाची चार कोन, आरोग्य पैसा मुळे दोन ||


भारताची राज्यघटना
शासकीय योजना
अपंग व्यक्तींना उपकरणे अथवा साहित्य खरेदीसाठी व उभारणीसाठी मदत (एडीआयपी योजना)         ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे गरजू अपंग व्यक्तींना आधुनिक, टिकाऊ व शास्त्रीय उपकरणे व इतर साहित्य उपलब्ध करून देणे ज्यायोगे त्यांच्या वास्तविक, सामाजिक व मानसिक पुनर्वसनास मदत होईल, ते अपंग असल्याचा त्यांच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम कमी होईल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. अशी उपकरणे ISI प्रमाणित असली पाहिजेत.
ADIP योजनेत दिल्या जाणार्‍या मदतीची आणि उत्पन्नाची मर्यादा :
एकूण उत्पन्न                                                           मदतीची रक्कम
(i) दरमहा रु 6,500/- पर्यंत                                       (i) उपकरणांची व साहित्याची पूर्ण किंमत
(ii) दरमहा रु. 6,501/- ते रु. 10,000/- पर्यंत                   (ii) उपकरणांची व साहित्याची 50% किंमत
ही योजना स्वयंसेवी संस्था, संबंधित मंत्रालयाच्या कार्यान्‍वयन एजन्‍सीज्, राष्ट्रीय संस्था व ALIMCO (a PSU) ह्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमार्फत राबविण्‍यात येईल.
अपंग व्यक्तींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्याची योजना
अपंगांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या ह्या योजनेनुसार दरवर्षी 500 नवीन शिष्यवृत्त्या जाहीर करण्‍यात येतात. मॅट्रिकनंतर एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचे व्यावसायिक अथवा तांत्रिक अभ्यासक्रम करू इच्छिणार्‍या अपंगांसाठी ह्या शिष्यवृत्त्या आहेत. तरी ही सेरेब्रल पाल्सी, मतिमंदता, बहुअपंगता आणि गंभीर स्वरूपाचे बहिरेपण असणार्‍यांसाठी इयत्ता नववीपासूनच्या शिक्षणासाठी देखील ह्या मिळू शकतात. ह्यांसाठी अर्ज करण्यासंबंधीच्या जाहिराती जून महिन्यात महत्वाच्या राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रांमधून दिल्या जातात आणि मंत्रालयाच्या वेबसाइटवर ही उपलब्ध असतात. राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांतील व्यवस्थापनांस ह्याची विस्‍तृत प्रसिद्धी करण्यास सांगितले जाते.
40% अथवा त्यापेक्षा जास्त अपंगता असणारे व ज्यांच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15,000 रु.पेक्षा जास्त नसेल असे विद्यार्थी ह्या शिष्यवृत्त्यांसाठी पात्र मानले जातात. पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर तांत्रिक अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणार्‍यांसाठी दरमहा रु. 700/- ची शिष्यवृत्ती देण्‍यात येते, वसतिगृहांत राहणार्‍यांसाठी ही रक्कम रु. 1,000/- असते. पदविका तसेच प्रमाणपत्र पातळीवरचे व्यावसायिक अभ्यासक्रम करणार्‍यांना दरमहा रु. 400/- ची तर वसतिगृहात राहणार्‍यांसाठी दरमहा रु. 700/- ची शिष्यवृत्ती दिली जाते. ह्या शिष्यवृत्तीखेरीज, विद्यार्थ्यांना दरवर्षी रु. 10,000/- पर्यंतची शैक्षणिक फी देखील परत करण्‍यात येते. ह्या योजनेअंतर्गतचे आर्थिक सहाय्य पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर तांत्रिक अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणार्‍या अंध व बहिर्‍या व्यक्तींना देखील, संपादन सॉफ्टवेअरसहित असलेल्या संगणकासाठी, मिळू शकते. सेरेब्रल पाल्‍सी ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट अ‍ॅक्सेस सॉफ्टवेअरसाठी मदत मिळते.

अपंग व्यक्ती

जनगणना
2001 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.19 कोटी अपंग व्यक्ती आहेत म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13 टक्के. ह्यामध्ये अंध, बहिरे, मुके, मर्यादित हालचाली करू शकणारे (लोकोमोटर) आणि मानसिक समस्या असलेले लोक समाविष्ट आहेत.
अशा अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. 49 टक्के साक्षर आहेत तर 34 टक्क्यांकडे रोजगार आहे. आतापर्यंत अशा व्यक्तींचे वैद्यकीय दृष्टीने  पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असे मात्र आता सामाजिक पुनर्वसनावर जास्त भर देण्‍यात येत आहे.
2001 च्या जनगणनेनुसार अपंगत्वाची आकडेवारी
हालचाल     28%
पाहणे          49%
ऐकणे           6%
बोलणे           7%
मानसिक          10%
स्रोत:भारताची जनगणना 2001
नॅशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) 2002 नुसार अपंगत्वाची आकडेवारी
हालचाल      51%
पाहणे          14%
ऐकणे          15%
बोलणे         10%
मानसिक          10%
स्रोत: नॅशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशन 2002
सामाजिक न्याय व सशक्‍तीकरण मंत्रालयामधील अपंगत्व विभाग अशा व्यक्तींना सबल व सक्षम करण्याचे काम करतो. 2001 च्या जनगणनेनुसार भारतात 2.19 कोटी अपंग व्यक्ती आहेत म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13 टक्के. ह्यामध्ये अंध, बहिरे, मुके, मर्यादित हालचाली करू शकणारे (लोकोमोटर) आणि मानसिक समस्या असलेले लोक समाविष्ट आहेत.

जादूटोणा आणि मंत्रतंत्र - सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

जादूटोणा म्‍हणजे काय ?
सैतानी शक्‍ती सिध्‍द करून राक्षसांच्‍या मदतीने करण्‍यात येणारी हानिकारक असामाजिक क्रिया आणि वर्तन
भानामती म्‍हणजे काय?
एका समुदायातील लोक इतरांना पारलौकिक शक्‍तींच्‍या मदतीने हानि पोचवू शकतात असा विश्‍वास
जादूटोणा मंत्रतंत्रापेक्षा वेगळा कसा काय?
  • चेटकीण
  • वंशपरंपरागत पध्‍दतीने पारलौकिक शक्‍ती सिध्‍द असलेली इतरांना छळणारी स्‍त्री
  • मांत्रिक
  • जादुई शक्‍ती सिध्‍द असलेला एक असा पुरूष ज्‍याचे उद्देश अत्‍यंत वाईट, घृणास्‍पद आणि सैतानी असतात.
प्रभावित असलेले सामाजिक वर्ग
  • सामाजिक आणि आर्थिक दृष्टिने गरीब, स्त्रिया, अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती आणि मागास वर्ग

तंबाखूला नाही म्हणा

तंबाखू खाणे आरोग्‍याला किती धोक्याचे आहे हे माहित असूनसुध्‍दा अनेक लोकांना तंबाखूचे व्यसन सोडवत नाही. तंबाखू कंपन्‍या ग्राहकांना आकर्षक पॅकिंग आणि जाहिरातीच्‍या इतर साधनांचा वापर करून मोहात पाडतात आणि आरोग्‍याला तंबाखू घातक आहे ह्याकडे दुर्लक्ष करण्‍यास भाग पाडतात. पॅकिंगवर दिलेला सावधगिरीचा इशारा तंबाखूबाबत सत्‍य प्रकट करण्‍यासाठी सर्वांत सोपा उपाय आहे. सावधगिरीचे असे संकेत ज्‍यांमध्‍ये चित्रांच्‍या सहाय्याने तंबाखूच्‍या दुष्‍परिणाम दर्शविण्‍यात आले आहेत आणि ज्‍यायोगे लोकांना तंबाखू सोडण्‍यास किंवा कमी करण्‍यासाठी प्रेरित करता येते असे संकेत/ इशारे जास्त प्रभावी असतात.
चित्रित संदेश, अगदी अशिक्षित व्‍यक्‍तीलासुध्‍दा तात्‍काळ आणि स्‍पष्‍ट संकेत देतात. मात्र ह्यामुळे तंबाखूच्‍या पॅकिंगची संपूर्ण शोभाच कमी होते – एका अशा उत्‍पा्दनासाठी महत्‍वाचे ते असते कारण त्‍याचे नवीन उपयोगकर्ते विशेषत: तरूण आणि इमेज व ब्रॅन्‍डच्‍या बाबतीत जागरूक आहेत. ह्या धमकीची प्रतिक्रिया म्‍हणून आणि सर्व देशांमधून कृतीची मागणी आल्‍यामुळे, वर्ल्‍ड नो टोबॅको डे 2009 मोहीम खालील मुख्‍य संदेशावर केंद्रित आहे: तंबाखूच्‍या पाकिटांवरील लिहिलेली आणि चित्रित असलेली हेल्‍थ वॉर्निंग तंबाखूच्‍या वापराने आरोग्‍याला असलेल्‍या गंभीर धोक्‍याबाबत लोकांमध्‍ये तंबाखूचे सेवन कमी करण्‍यासाठी जागरूकता आणण्‍यासाठी सर्वांत कमी खर्चिक ठरली आहे.
धूम्रपानाचे दुष्‍परिणाम
  • तंबाखू हे मृत्यूचे एक मुख्‍य कारण आहे. दर वर्षी 50 लाखांपेक्षा जास्त लोक तंबाखूच्‍या दुष्परिणामांमुळे मरतात – एचआईव्ही/एड्स, मलेरिया आणि क्षयरोग आदी कारणांनी मृत पावणा-या लोकांच्या एकत्रित संख्येपेक्षाही ही संख्या खुप जास्त आहे.
  • उत्‍पादकाच्‍या मनाप्रमाणे वापर केल्‍यास मरण देणारे हे एकच उत्‍पादन आहे. धूम्रपान करणार्‍या लोकांपैकी अर्धे तंबाखू-जन्‍य रोगानेच मरतात. तसेच ह्यामुळे निघणारा धूरही सर्वांसाठी घातक आहे.
  • तंबाखू कंपन्‍या दर वर्षी नवीन लोकांना ही सवय लावण्‍यासाठी आणि जुन्‍या लोकांना ही सवय सोडण्‍यापासून परावृत्त करण्‍यासाठी कोट्यावधि डॉलर खर्च करतात.
  • पॅकेज डिझाइनच्‍या उपयोगासह जाहिराती आणि प्रचार मोहिमा, ह्या सर्वांचा आकर्षक उपयोग करून तंबाखू उद्योग त्‍याच्‍या उत्पादांच्‍या घातक प्रभावांकडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात.
  •  बहुतेक देश WHO फ्रेमवर्क कन्‍व्‍हेंशन ऑन टोबॅको कंट्रोलमध्‍ये सांगितल्याप्रमाणे, तंबाखूच्‍या पाकिटांवर ग्राफिक्‍सच्‍या मदतीने तंबाखूचे धोके दाखविण्‍याची गरज असल्‍याची मागणी करीत लढा देत आहेत. ते ह्या आंतरराष्‍ट्रीय कराराच्‍या अंतर्गत त्‍यांच्‍या वचनबध्‍दता पूर्ण करण्‍यासाठी WHO द्वारे विकसित करण्‍यात आलेल्‍या MPOWER टेक्निकल असिस्‍टन्‍स पॅकेजचा उपयोग करतात.
  • प्रभावी आरोग्‍य संकेत, विशेषत: ज्‍यामध्‍ये चित्रांचा समावेश आहे, उपयोगकर्त्‍यांना धूम्रपान सोडण्‍याची सोडण्‍याची किंवा व नवीन उपयोगकर्त्‍यांना त्‍यापासून कमी करण्‍याची प्रेरणा देतात. ही वास्‍तविकता असून देखील, 10 मधील 9 लोक अशा देशांत राहतात जेथे तंबाखूच्‍या पाकिटांवर चित्रसंदेशाची गरज भासत नाही.
  • निकोटीन एक अत्‍यंत लवकर चटक लावणारा पदार्थ आहे. लोकांना ह्याच्‍या वास्‍तविक धोक्‍यांच्‍या बाबतीत जागरूक करून तंबाखूचा वापर कमी करण्‍याची प्रेरणा देण्‍यासाठी फार मोठी वाटचाल करावी लागेल. तंबाखूच्‍या पाकिटांवर धोक्‍याचे संदेश देणे हे तंबाखू सोडविण्‍यासाठी अत्‍यंत सोपे, कमी खर्चाचे आहे.
मद्यपान बंद करण्‍यासाठी 10 उत्तम टिप्‍स्
दारू पिणे 21 दिवसांत बंद करा  
1) आपले ध्‍येय निश्चित करा. दारू पिण्‍याबाबत तुमची वैयक्तिक कारणे कोणती? आपले विचार लिहून काढा आणि काही ध्‍येय निश्चित करण्‍यासाठी हे तुम्‍हांला मार्गदर्शक ठरू देत.
तुम्‍ही मद्यपानाच्‍या प्रसंगापासून दूर राहू इच्छिता, नियंत्रित मद्यपानात सहभागी होऊ इच्छिता, किंवा पिणे एकदम बंद करू इच्छिता, तुम्‍ही असे का करीत आहांत ह्याची खात्री करून घ्‍या आणि हे तुमच्‍याचकरीता आहे, इतर कोणासाठीही नाही ह्याची खात्री बाळगा नाही तर तुम्‍हांला यश मिळणार नाही.
2) आगामी आठवड्यातील कोणताही दिवस दारू पिणे कमी करण्‍यासाठी निवडा. अजून एखाद्या दिवशी मद्यपान करू नका जेव्‍हां तुम्‍ही शांतचित्त असाल. आणखी एखाद्या दिवसाची योजना करा जेव्‍हा मद्यपान टाळणे सहज शक्‍य ठरू शकते.
3) माघार घेऊ नका. दारू पिणे सोडून देणे हे फार सोपे आहे असे आम्‍ही ह्या लेखात कोठेही म्‍हटलेले नाही. कारणांसह आपले ध्‍येय आपल्‍या मनांत/डोक्‍यात ठेवा आणि ह्या ध्‍येयांना प्राथमिकता द्या. जर तुम्‍ही एखाद्या रात्रीत खूप मद्यपान केले तरी आपल्‍या ध्‍येयाकडे दुर्लक्ष करू नका. पुढच्‍या दिवशी पुन्हा मार्गावर या. जेव्हां तुम्‍ही स्‍वत:ला अयशस्‍वी ठरविता तेव्हा रॉबर्ट एफ केनेडीचे हे वक्‍तव्‍य आठवा ‘जे लोक अपयशी होण्‍याचे धाडस करू शकतात, त्‍यांनाच सर्व काही मिळते’. मद्यपानाची सवय कमी करणे किंवा एकदम सोडणे ह्यात तुम्‍ही यश मिळवू शकता पण जेव्‍हां तुम्‍ही तशी इच्‍छा ठेवाल तेव्‍हा.
4) आपली योजना इतरांनाही सांगा. तुमचे कुटुंब आणि काही विश्वासू मित्र ह्यांना आपल्‍या योजनेबाबत सांगा. यशस्‍वी होण्‍यात ते तुमची मदत कशा प्रकारे करू शकतात ते तुम्‍ही त्‍यांना सांगा.
5) आपल्‍या कुटुंब आणि मित्रांकडून साहाय्य मागा. जे लोक खरोखरच तुमचे शुभचिंतक आहेत ते संपूर्ण सुट्टीचा काळ तुमची मदत करून आनंदित होतील. पुढाकार घ्‍या आणि तुमच्‍या चिंता त्‍यांना सांगा.
6) एक ब्रेक घ्‍या. दारू पिणे कमी करण्‍याच्‍या ह्या प्रयासात, एक दिवस असा निश्चित करा ज्‍या दिवशी तुम्‍ही दारू पिणार नाही. जेव्‍हा हा एक दिवस सोपा होईल, ह्याचे दोन दिवस करा, मग तीन, आणि नंतर एक आठवडा करा. तुमचे मोठे ध्‍येय लहान ध्‍येयांच्‍या स्‍वरूपात पूर्ण करणे जास्त सोपे आहे. ह्याऐवजी, तुमच्‍या ध्‍येयास चिकाटीने धरून राहण्‍यासाठी ह्याची तुम्‍हांला मदतच होईल.
7) जेव्‍हा तुम्‍ही जास्‍त मद्यपान करू शकता तेव्‍हाच निश्‍चय करा आणि मगच टाळण्‍याचा निर्धार करा. तुमच्‍या योजनेला यश मिळावे ह्यासाठी तुम्‍ही घरी किंवा एखाद्या पार्टीत दारूऐवजी एखादे दुसरे ड्रिंक घ्‍या. तुम्ही मद्यपानाची सवय सोडण्‍यासाठी एखाद्या रचनात्‍मक कामांत स्‍वत:ला गुंतवू शकता. जसे पेंटिंग, व्‍यायाम करणे, वाचन, किंवा अशाच इतर गोष्‍टी.
8) मोहाला बळी पडू नका. तुम्हांला पिण्‍याची इच्‍छा केव्‍हा होते? पार्टीमध्‍ये की घरी एकटे असताना? स्‍वत:चे मोह जाणून घ्‍या आणि त्‍यांना टाळण्‍यासाठी सोपे उपाय करा. चविष्‍ट लागणारी पेये निवडा आणि घरी देखील तसेच करा. तुम्ही स्‍वत:ला मद्यपानाची सवय सोडण्‍यासाठी एखाद्या रचनात्‍मक कामांत गुंतवू शकता. जसे पेंटिंग, व्‍यायाम करणे, वाचन, किंवा अशाच इतर गोष्‍टी.
9) स्वत:ला प्रोत्साहन द्या. आपल्‍या दारूकरीता असलेला पैसा खर्च एकदा आपल्‍या कुटुंब किंवा मित्रांबरोबर सिनेमाला जाऊन, मजा करून पहा. बाहेर जेवायला जा, सिनेमा पह, किंवा एखादा खेळ खेळा.
10) जर हे देखील तुम्‍हांला जड जात असेल तर आणखी मदत घ्‍या आणि येथे जाऊन पहा: http://www.stopdrinkingadvice.org/guide/ विशेषज्ञांना विचारा.