सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२


अपंग व्यक्ती

जनगणना
2001 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.19 कोटी अपंग व्यक्ती आहेत म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13 टक्के. ह्यामध्ये अंध, बहिरे, मुके, मर्यादित हालचाली करू शकणारे (लोकोमोटर) आणि मानसिक समस्या असलेले लोक समाविष्ट आहेत.
अशा अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. 49 टक्के साक्षर आहेत तर 34 टक्क्यांकडे रोजगार आहे. आतापर्यंत अशा व्यक्तींचे वैद्यकीय दृष्टीने  पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असे मात्र आता सामाजिक पुनर्वसनावर जास्त भर देण्‍यात येत आहे.
2001 च्या जनगणनेनुसार अपंगत्वाची आकडेवारी
हालचाल     28%
पाहणे          49%
ऐकणे           6%
बोलणे           7%
मानसिक          10%
स्रोत:भारताची जनगणना 2001
नॅशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) 2002 नुसार अपंगत्वाची आकडेवारी
हालचाल      51%
पाहणे          14%
ऐकणे          15%
बोलणे         10%
मानसिक          10%
स्रोत: नॅशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशन 2002
सामाजिक न्याय व सशक्‍तीकरण मंत्रालयामधील अपंगत्व विभाग अशा व्यक्तींना सबल व सक्षम करण्याचे काम करतो. 2001 च्या जनगणनेनुसार भारतात 2.19 कोटी अपंग व्यक्ती आहेत म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13 टक्के. ह्यामध्ये अंध, बहिरे, मुके, मर्यादित हालचाली करू शकणारे (लोकोमोटर) आणि मानसिक समस्या असलेले लोक समाविष्ट आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा