शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

लग्नाच्या सुरवातीच्या दिवसामध्ये गोड मुका घेऊन होणारी दिवसाची सुरवात काही वर्ष ओलांडल्यावर कडू कशी होते...
सकाळी ऑफिस ला निघताना किती गडबड असतेना,
वेळेवर पोहोचलेच पाहिजेच, आधीच उशीर झालाय त्यात रस्त्यात गर्दी असेन, रेल्वे फाटक लागायला नको, आज मंदिर जायला जमणार नाही, असे विचार मनात चालूच असतात...
त्यामध्ये, बाथरूम मध्ये गरम पाणी, टॉवेल ठेवले कि नाही, कपडे इस्त्री करून तयार झाले कि नाही, डबा अजून तय्यार होतोय अशी बायको मागे बडबड चालू ठेवत आपण घाई करत असतो.
नवऱ्याला होत असणाऱ्या गडबडीची जाणीव असणारी बायको त्यांचा पुढे-पुढे-पुढे करत असते आणि आपल्याच गडबडीत मग्न नवरोबाला ज्याची जाणीव होतच नाही..
सकाळ सारखीच संध्याकाळ हि असते, कामावरून थकून आल्यावर जेव्हा पत्नीला वाटते कि आता दिवस भरच्या थकाकी नंतर निवांत वेळ थोडा सोबत प्रेमाच्या गोडव्यात घालवू पण त्यावेळी सुद्धा आपण स्वताच्याच दिवस भर ऑफिस मध्ये केलेले कृत्यांच चिठ्ठा बायकोसमोर रकडत असतो आणि अशी रात्र हि संपते..
मग हा प्रश्न उरतो कि, लग्नाच्या सुरवातीच्या दिवसामध्ये गोड मुका घेऊन होणारी दिवसाची सुरवात काही वर्ष ओलांडल्यावर कडू कशी होते??
दिवसभर आपल्या साठी आपल्या परिवार मुल-बाळ साठी दिवस रात्र राब राब करणारी बायकोच्या मनाला कधी ओळखण्याचा का आपण प्रयत्न करत नाही...

याच विचारातून एक स्त्रीच्या मनोअंतर्गत भावनांवर कविता प्रस्तुत आहे..

तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी.....
तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...
मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........
तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....
हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....
मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....
अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी...

मुका जीव ...

मुलगी:


मुका जीव ... ४ लोकां सारखा माझ्याशी बोलू नाही शकत ...


पण माझ्या भावना हाच बरोबर जाणतो ... आणि माझ्याशी सवांद हाच पाहिजे तसा साधतो ....


पुरात घर वाहून गेले ... स्वप्न वाहून गेले पण नाकातोंडात पाणी जरी गेले तरी हां जिवाचा सखा असा नाही जावू द्यायचा हाच ध्यास ....

पिल्लू :

तुझ्या साठी चं आयुष्य वेचेन माझं

मला तू आज वाचवल :)

दुसर्यांच्या भावना समझुन घेवून वागा दुसरा तुम्हाला स्वतावून समझुन घेईल