शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

लग्नाच्या सुरवातीच्या दिवसामध्ये गोड मुका घेऊन होणारी दिवसाची सुरवात काही वर्ष ओलांडल्यावर कडू कशी होते...
सकाळी ऑफिस ला निघताना किती गडबड असतेना,
वेळेवर पोहोचलेच पाहिजेच, आधीच उशीर झालाय त्यात रस्त्यात गर्दी असेन, रेल्वे फाटक लागायला नको, आज मंदिर जायला जमणार नाही, असे विचार मनात चालूच असतात...
त्यामध्ये, बाथरूम मध्ये गरम पाणी, टॉवेल ठेवले कि नाही, कपडे इस्त्री करून तयार झाले कि नाही, डबा अजून तय्यार होतोय अशी बायको मागे बडबड चालू ठेवत आपण घाई करत असतो.
नवऱ्याला होत असणाऱ्या गडबडीची जाणीव असणारी बायको त्यांचा पुढे-पुढे-पुढे करत असते आणि आपल्याच गडबडीत मग्न नवरोबाला ज्याची जाणीव होतच नाही..
सकाळ सारखीच संध्याकाळ हि असते, कामावरून थकून आल्यावर जेव्हा पत्नीला वाटते कि आता दिवस भरच्या थकाकी नंतर निवांत वेळ थोडा सोबत प्रेमाच्या गोडव्यात घालवू पण त्यावेळी सुद्धा आपण स्वताच्याच दिवस भर ऑफिस मध्ये केलेले कृत्यांच चिठ्ठा बायकोसमोर रकडत असतो आणि अशी रात्र हि संपते..
मग हा प्रश्न उरतो कि, लग्नाच्या सुरवातीच्या दिवसामध्ये गोड मुका घेऊन होणारी दिवसाची सुरवात काही वर्ष ओलांडल्यावर कडू कशी होते??
दिवसभर आपल्या साठी आपल्या परिवार मुल-बाळ साठी दिवस रात्र राब राब करणारी बायकोच्या मनाला कधी ओळखण्याचा का आपण प्रयत्न करत नाही...

याच विचारातून एक स्त्रीच्या मनोअंतर्गत भावनांवर कविता प्रस्तुत आहे..

तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी.....
तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...
मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........
तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....
हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....
मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....
अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी...

मुका जीव ...

मुलगी:


मुका जीव ... ४ लोकां सारखा माझ्याशी बोलू नाही शकत ...


पण माझ्या भावना हाच बरोबर जाणतो ... आणि माझ्याशी सवांद हाच पाहिजे तसा साधतो ....


पुरात घर वाहून गेले ... स्वप्न वाहून गेले पण नाकातोंडात पाणी जरी गेले तरी हां जिवाचा सखा असा नाही जावू द्यायचा हाच ध्यास ....

पिल्लू :

तुझ्या साठी चं आयुष्य वेचेन माझं

मला तू आज वाचवल :)

दुसर्यांच्या भावना समझुन घेवून वागा दुसरा तुम्हाला स्वतावून समझुन घेईल 

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

मी आणि शब्द


मी
आपले विचार
आपल्या मनाच्या भावना
कधी मांडूच शकलो नाही
तुझ्यासमोर
अलंकृत शब्दात.
पण तू
तुही
कधी वाचून घेतले नाही
माझ्या चेहऱ्यावरील भाव
ज्यांना अलंकारांची गरजच नसते मुळी.
मी भोळा
मला सुध्दा
कळलेच नाही कधी
मनातील भाव
शब्दात व्यक्त कसे करतात ते
मला वाटायचे
तू माझा चेहरा वाचशील
आणि
माझ्या मनाला समजून घेशील
मी तुझ्या प्रतिसादाची वाट बघत राहिलो
आणि
एके दिवशी मला तुझ्या लग्नाची वार्ता कळली
आणि माझे मन विषण्ण झाले.
तेव्हा हि मला शब्दात
आपले दुख व्यक्त करता आले नाहीच
फक्त दोन अश्रू
डोळ्यातून वाहून गालावर घरंगळले
आणि मी
शब्द शोधात राहिलो....


मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

            माझ्याबद्दल काय लिहायचा अजून ठरवले  नाही पण ह्या जीवनात काय चालू आहे एकीकडे महागाई डोंगर
आणि नेत्यांची पैश्याची उधळ पट्टी नगर सेवक , आमदार , खासदार ह्यांना कसली कमी आहे हो जरा तुम्ही सांगाल काय ? सरकारी गाड्या ,राहण्याची सोय , ह्यांना जनतेची  सेवा काराण्यासाठी सरकारी निधी तेही भरमसाठ
कसली कमी तरीही ८०००० ते १००००० पर्यंत पगार हवा आहे . गरीब जनता वेतन काय असतील आपण आणि हे नेते कधीच विचार केला नाही ते कसे  आपले परिवार सांभाळतील. नुत्तेस कानावर पडले शहरी ३४ रुपये दिवसाचा खर्च पुरे मी ह्या नेत्यालाच विचारतो तुम्ही किव्हा तुम्ही बायको ह्या ह्या ३४ रुपया मध्ये घर चालवेल का ?
         जरा विचार करा ज्यांच्या स्वताचे घर नाही , दोन मुले , दवाखान्याच खर्च ,आणि शिक्षणाचा खर्च गरीब नागरिक काय काय करणार !!!
            खरच जीवनच कंटाळा आलाय हो