सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२


स्त्रीभ्रूण हत्‍या

स्त्रीभ्रूण हत्‍या मुलगा व्‍हावा अशी इच्‍छा बाळगण्‍यामुळे मुलींची हेतूपुरस्‍सर करण्‍यात येणारी हत्‍या. असे प्रकार त्‍या भागांमध्‍ये होतात जेथे मुलीपेक्षा मुलाच्‍या जन्‍मास जास्त महत्त्व दिले जाते.
स्त्रीभ्रूण हत्‍येविषयी सत्ये
  • संयुक्त राष्ट्र बाल कोषाच्‍या (यूनिसेफ) एका अलिकडील अहवालाप्रमाणे वर्गीकरणात्‍मक लिंगभेदाचा परिणाम म्‍हणून भारतीय लोकसंख्‍येतून 50 लाख मुली व स्त्रिया कमी झाल्‍या आहेत.
  • जगातील अनेक देशांमध्‍ये, दर 100 पुरुषांमागे सुमारे 105  मुली आहेत.
  • भारतात दर 100 पुरुषांवर 93 पेक्षाही कमी मुली आहेत.
  • संयुक्त राष्ट्रांच्‍या अंदाजाप्रमाणे भारतात दररोज 2000 बेकायदेशीर स्त्रीभ्रूण हत्‍या होतात.
अदृष्‍य धोके
भारतातील वाढत जाणा-या स्त्रीभ्रूण हत्‍येमुळे समाजात स्त्रियांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लैंगिक हिंसा आणि बालशोषणाबरोबरच एकच पत्नी अनेकांमध्ये वाटून घेण्याची प्रथा सुरू होण्‍याबाबत अमेरिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. ह्यामुळे सामाजिक मूल्यांचा –हास होईल आणि संकटपूर्ण परिस्थिति निर्माण येईल.
कारणे
तथापि, हा स्‍त्री-विरोधी पूर्वाग्रह आता फक्‍त गरीब कुटुंबांपर्यंतच सीमित नाही. बहुतेक भेदभाव सांस्कृतिक मान्यता आणि सामाजिक मानदंडांमुळे बळावतो. ह्या कुप्रथा बंद करण्‍यासाठी स्‍वत:लाच आव्‍हान द्यावे लागणार आहे.
भारतातील स्‍त्री-नापसंतीच्‍या प्रथेसाठी सामाजिक-आर्थिक कारणांना जबाबदार ठरविले जाऊ शकते. भारतातील अध्ययनात भारतामधील स्‍त्री-नापसंतीचे तीन कारक संकेत मिळाले आहेत, ज्‍यामध्‍ये आर्थिक उपयोगिता, सामाजिक-सांस्‍कृतिक उपयोगिता आणि धार्मिक समारंभांचा समावेश आहे.
  • आर्थिक उपयोगितेचा घटक म्‍हणून अध्‍ययनांनी दर्शविले आहे की मुलीपेक्षा मुलगा हा घरच्‍या शेतीची देखभाल, कुटुंबाचे भरण-पोषण, वृध्‍दापकाळी आई-वडिलांचा सांभाळ करतो.
  • लग्‍न झाल्‍यावर, मुलगा कुटुंबाची संपत्ति म्‍हणून एक सून आणतो जी घरकामांत मदत करते आणि हुंड्याच्‍या स्‍वरूपात आर्थिक संपन्‍नतादेखील आणते, तर मुली लग्‍न झाल्‍यानंतर निघून जातात आणि हुंड्याच्‍या स्‍वरूपात एक आर्थिक दंड उकळतात.
  • स्‍त्री-नापसंतीचा सामाजिक-आर्थिक घटक असा की, चीनप्रमाणेच, भारतातील कुटुंबांत पितृसत्ताक व्यवस्थेनुसार कौटुंबिक रेषेच्‍या निरंतरतेसाठी कमीत कमी एक पुत्र असणे आवश्‍यक आहे आणि पुत्र कुटुंबाची प्रतिष्‍ठा वाढवितात.
  • स्‍त्री-नापसंतीचा अंतिम घटक म्‍हणजे काही धार्मिक कार्ये फक्‍त मुलेच करू शकतात, हिंदू संस्‍कृतिप्रमाणे, जो जनादेश पाळतो आणि त्‍यांच्‍या स्वर्गीय आई-वडिलांच्‍या चितेस अग्नि देऊन त्‍यांच्‍या आत्‍म्‍यास मोक्ष मिळवून देण्‍यात मदत करतात.
सरकारतर्फे पुढाकाराची पाऊले
ह्या सामाजिक कुप्रथेचा अंत करण्‍यासाठी, आणि समाजातील लोकांचा दृष्टिकोन बदलण्‍यासाठी सरकारने ह्या बाबत पुढाकार घेत पुष्‍कळ पावले उचलली आहेत. पुष्‍कळसे कायदे, अधिनियम आणि योजनांचा आरंभ करण्‍यात आला आहे, जसे:
  • हुंडा विरोधी कायदे – हुंडा निषेध अधिनियम 1961
  • लिंग परीक्षण विरोधी कायदे - PCPNDT अधिनियम
  • कन्‍या शिक्षण प्रोत्साहन कायदे
  • स्‍त्री अधिकार/हक्‍क अनुमोदन कायदे
  • कन्‍येसाठी संपत्तीमध्‍ये समान अधिकार अनुमोदन कायदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा